Home महाराष्ट्र Mission 150” मोहिमेला वेग; उच्च प्राधान्य गावांसाठी आरोग्य व पोषण कृती आराखड्याचा...

Mission 150” मोहिमेला वेग; उच्च प्राधान्य गावांसाठी आरोग्य व पोषण कृती आराखड्याचा आढावा

“Mission 150” campaign gains momentum; Review of Health and Nutrition Action Plan for High Priority Villages

नंदुरबार जिल्ह्यात आज “Mission 150 – A Convergent Life Cycle Approach for 150 High-Burden Villages” अंतर्गत जिल्हास्तरीय कृती आराखडा समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील उच्च प्राधान्य असलेल्या १५० गावांमध्ये आरोग्य, पोषण आणि माता-बाल विकास सेवांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

बैठकीमध्ये आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, RBSK तसेच विविध विभाग आणि विकास भागीदार यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला.

गावनिहाय बेसलाईन डेटा, प्रमुख KPIs (Key Performance Indicators), क्षेत्रीय भेटींचे नियोजन, मासिक आढावा यंत्रणा आणि सेवा वितरण अधिक परिणामकारक करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. डेटा-आधारित नियोजनाद्वारे प्रत्येक गावातील वास्तविक गरजा ओळखून त्यानुसार कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला.

किशोरी, गर्भवती व स्तनदा माता तसेच ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी जीवनचक्र आधारित दृष्टिकोन स्वीकारण्यात येत असून, कुपोषण कमी करणे, मातृ व बाल आरोग्य निर्देशांक सुधारणे आणि शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचविणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार सेवा पोहोचवण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणा अधिक सक्षम करणे, समुदाय सहभाग वाढविणे आणि विभागीय एकत्रित कृतीद्वारे शाश्वत बदल घडवून आणण्यावर भर देण्यात आला.

“Mission 150” हा उपक्रम प्रशासन, विविध विभाग आणि विकास भागीदार यांच्या समन्वयातून आरोग्य व पोषण क्षेत्रात दीर्घकालीन आणि परिणामकारक बदल घडवून आणण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रत्येक माता, बालक आणि किशोरीपर्यंत दर्जेदार सेवा पोहोचवून निरोगी व सशक्त नंदुरबार घडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.

#Mission150#Nandurbar#माताआरोग्य#बालआरोग्य#NutritionMission#HighBurdenVillages#PublicHealth#WomenAndChildDevelopment#RBSK#TribalHealth#HealthyNandurbar#CommunityHealth#DataDrivenGovernance#IntegratedDevelopment#कुपोषणमुक्तनंदुरबार

error: Content is protected !!
Exit mobile version