Home नंदुरबार जिल्हा प्रकल्प दिशा अंतर्गत जांगठी येथे बहु-सेवा वितरण शिबिर संपन्न

प्रकल्प दिशा अंतर्गत जांगठी येथे बहु-सेवा वितरण शिबिर संपन्न

0
प्रकल्प दिशा अंतर्गत जांगठी येथे बहु-सेवा वितरण शिबिर संपन्न
Multi-service delivery camp held at Jangthi under Project Disha.

मा. डॉ. मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प दिशा अंतर्गत जांगठी ग्रामपंचायत कार्यालय येथे बहु-सेवा वितरण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

यावेळी मा. जिल्हाधिकारी, डॉ. मित्ताली सेठी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, गरजा तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. दुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या सेवा एकाच ठिकाणी आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिरात जन्म-मृत्यू दाखले, उत्पन्न व जात प्रमाणपत्रे, विवाह नोंदणी, आधार नोंदणी व अद्ययावत सेवा, आरोग्य तपासणी (सिकल सेल, ॲनिमिया, ANC/PNC, SAM/MAM), पीएम-किसान व अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी, महाडीबीटी सेवा, रेशन कार्ड, संजय गांधी व सामाजिक सुरक्षा योजना, तसेच बँकिंग सेवा (e-KYC, नवीन खाते उघडणे इ.) उपलब्ध करून देण्यात आल्या.

विविध शासकीय योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व लाभांचे वितरणही करण्यात आले.

दुर्गम व वंचित भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या सेवा थेट पोहोचवून सर्वसमावेशक, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दिशेने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरले.

#प्रकल्पदिशा#Nandurbar#DistrictAdministrationNandurbar#DrMittaliSethi#GoodGovernance#PublicServiceDelivery#InclusiveDevelopment#TribalDevelopment#GovernmentServices#Jangthi#NandurbarDistrict#CitizenCentricGovernance#ViksitNandurbar#ServiceAtDoorstep

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here