Home नंदुरबार जिल्हा सामूहिक वनहक्क क्षेत्र विकासासाठी नंदुरबार प्रशासनाचा पुढाकार ‘प्रोजेक्ट हरियाली’ अंतर्गत वृक्ष, बांबू...

सामूहिक वनहक्क क्षेत्र विकासासाठी नंदुरबार प्रशासनाचा पुढाकार ‘प्रोजेक्ट हरियाली’ अंतर्गत वृक्ष, बांबू व गवत लागवडीचे नियोजन

Nandurbar administration's initiative for the development of collective forest rights areas, planning for tree, bamboo and grass plantation under 'Project Hariyali'

(नंदुरबार) नियोजन भवन, नंदुरबार येथे मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली सामूहिक वनहक्क (CFR) क्षेत्रामध्ये वृक्षलागवड, बांबू लागवड, गवत लागवड तसेच “प्रोजेक्ट हरियाली” संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

धडगाव तालुक्यातील 143 मान्य सामूहिक वनहक्क गावांपैकी 20 गावांची निवड करून वनसंवर्धन, रोजगारनिर्मिती आणि शाश्वत उपजीविकेच्या दृष्टीने एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. या बैठकीत निवडलेल्या गावांमध्ये बिहार पॅटर्नद्वारे रोजगार हमी योजनेंतर्गत सुमारे 290 हेक्टर क्षेत्रावर वृक्ष, बांबू आणि गवत लागवडीचे नियोजन करण्यात आले.

प्रत्येक गावात रोपवाटिका उभारणे, सिंचन सुविधा निर्माण करणे, कुंपण करणे तसेच CFR धारकांना फळबाग लागवडीस प्रोत्साहन देणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. रोपांची निवड, उपलब्धता, खड्डे खोदकाम आणि क्षेत्रनिहाय नियोजन सहभागी पद्धतीने करण्यात आले.

बैठकीत CFR व्यवस्थापन समिती सदस्यांशी थेट संवाद साधून स्थानिक गरजा व संसाधनांच्या आधारे नियोजन करण्यात आले. “फक्त झाडे लावणे नव्हे, तर ती जगवून त्यातून स्थानिकांना रोजगार व उपजीविका निर्माण करणे हेच उद्दिष्ट आहे,” असे मा. जिल्हाधिकारी यांनी यावेळी स्पष्ट केले.

वनसंवर्धनासोबतच गावस्तरावर शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून कार्यवाही करण्यात येणार असून, या गावांचा आदर्श भविष्यात इतर CFR गावांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बैठकीत “वनसंपदा पोर्टल” आणि “प्रोजेक्ट हरियाली” संदर्भातही सादरीकरण करण्यात आले.

#ProjectHariyali#CFR#ForestRights#TreePlantation#BambooPlantation#Nandurbar#SustainableDevelopment#TribalDevelopment#GreenNandurbar#MGNREGA#EnvironmentalConservation#CommunityParticipation#ForestManagement#ClimateAction#RuralDevelopment

error: Content is protected !!
Exit mobile version