Home नंदुरबार नंदुरबार : ‘प्रकाशवाटा’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची शासकीय आश्रम शाळांना...

नंदुरबार : ‘प्रकाशवाटा’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची शासकीय आश्रम शाळांना भेट

Nandurbar: District Collector Dr. Mittali Sethi visits government ashram schools under ‘Prakashwata’ initiative

(नंदुरबार) जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी (भा.प्र.से.) यांनी प्रकाशवाटा उपक्रम अंतर्गत निवड करण्यात आलेल्या शासकीय आश्रम शाळांची पाहणी केली. या पाहणीत त्यांनी शाळेतील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांच्या निवास व भोजन व्यवस्था तसेच अध्यापनाच्या गुणवत्तेचा सखोल आढावा घेतला.

मा. जिल्हाधिकारी यांनी खालील शाळांना भेट दिली –

शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा, नंदुरबार

शासकीय पोस्ट बेसिक आश्रम शाळा, कोठली (ता. नंदुरबार)

शासकीय पोस्ट बेसिक शाळा, ढोंगसागाळी (ता. नवापूर)

भेटीदरम्यान डॉ. मित्ताली सेठी यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या वर्गखोल्या, वस्तीगृह, भोजनालय, लायब्ररी व विज्ञान प्रयोगशाळांची पाहणी केली. त्यांनी विशेषतः विद्यार्थ्यांसाठी अध्ययन-अध्यापनासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

शासकीय आश्रम शाळा ढोंगसागाळी येथे सुरु असलेल्या नवीन वस्तीगृह इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून इमारत हस्तांतरणासंबंधी माहिती घेतली.

मा. जिल्हाधिकारी यांनी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना शालेय परिसर स्वच्छ, सुटसुटीत व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसेच शाळेत उपलब्ध असणाऱ्या विज्ञान प्रयोगशाळेतील उपकरणांचा विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शिक्षणासाठी पूर्णतः वापर करण्याचे निर्देश दिले.

‘प्रकाशवाटा’ हा जिल्हा प्रशासनाचा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, आत्मविश्वास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी सुरू करण्यात आला असून, या पाहणीद्वारे त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला.

#नंदुरबार#डॉमित्तालीसेठी#Prakashwata#EducationForAll#NandurbarDistrict#TribalEducation#AshramSchool#StudentDevelopment#InnovationInEducation#DistrictAdministration#SmartNandurbar#DigitalEducation#SchoolVisit#EducationReform#WomenLeadership#InspiringGovernance#VikasachiPrakashwata

error: Content is protected !!
Exit mobile version