Home टेक न्युज महाराष्ट्र शासनाच्या गुंतवणूक आणि विकासाला नवी दिशा

महाराष्ट्र शासनाच्या गुंतवणूक आणि विकासाला नवी दिशा

New direction for Maharashtra government's investment and development

कोविड कालखंडात पती गमावलेल्या एकलमातेचा ‘सोबत पालकत्व फाऊंडेशन’मार्फत पुनर्विवाह संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्याला भावी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार संजय भेंडे, नागपूरच्या महापौर निता ठाकरे, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, ‘सोबत पालकत्व फाऊंडेशन’चे अध्यक्ष व माजी आमदार संदीप जोशी आणि देवयानी जोशी आदी उपस्थित होते.

कोविडच्या काळात घरातील कर्ता पुरूष गमावल्याने अनेक महिलांचे भवितव्य अंधःकारमय झाले. त्यावेळी सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून जवळपास २९३ परिवारांची नोंदणी झाली. यापैकी शंभर परिवारांचे पालकत्व मी स्वीकारले. कोविडपासून आजपर्यंत त्यांनी शिक्षण तसेच इतर गोष्टींकडे लक्ष दिले. आज त्यापैकी एका एकल मातेचा विवाह झाला आहे. पुढील काळात जवळपास ३०० मुलींचा विवाह होईपर्यंत ही जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. आज प्रीतीच्या विवाहामुळे तिच्या जीवनात एक प्रकारचे स्थैर्य येत असल्याचे आत्मिक समाधान आहे. याचा एक वेगळाच आनंद असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विवाह सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली

error: Content is protected !!
Exit mobile version