Home महाराष्ट्र एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी दिनेश लडकत, सरचिटणीसपदी डॉ.शिवाजी तिकांडे

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी दिनेश लडकत, सरचिटणीसपदी डॉ.शिवाजी तिकांडे

New executive committee of MSEB Officers Association announced, Dinesh Ladkat as president, Dr. Shivaji Tikande as general secretary

जळगाव/धुळे/नंदुरबार : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ऑफिसर्स असोसिएशनचे 48 वे वार्षिक अधिवेशन लातूर येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी पार पडले. यात नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी दिनेश लडकत (पुणे) यांची तर सरचिटणीसपदी डॉ.शिवाजी तिकांडे (छत्रपती संभाजीनगर) यांची निवड करण्यात आली.

    उर्वरित कार्यकारिणी : संघटन सचिव – प्रवीण गायकवाड (छत्रपती संभाजीनगर), कोषाध्यक्ष – प्रमोद कांबळे (अमरावती), कार्याध्यक्ष- महेश जाधव (महावितरण, नागपूर), नितीन सूर्यवंशी (महानिर्मिती, कोराडी), उपसरचिटणीस – विकास बांबल (महावितरण, अमरावती), नंदकिशोर सातकर (महानिर्मिती, खापरखेडा), सहसचिव – दिनेश ठाकूर (लातूर), ऋषिकेश गायकवाड (बारामती), संतोष आडुळकर (सोलापूर), अनंत ठवकर (कोराडी), महिला प्रतिनिधी – शिल्पा बारापात्रे (नागपूर), आद्यश्री कांबे (अमरावती), श्रद्धा पोवार (मुंबई). महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही शासकीय वीज कंपन्यांतील सर्व अतांत्रिक संवर्गातील अतांत्रिक अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नवीन कार्यकारिणी अधिक जोमाने प्रयत्न करेल, असे नवनिर्वाचित सरचिटणीस डॉ.शिवाजी तिकांडे यांनी सांगितले.

error: Content is protected !!
Exit mobile version