Home नंदुरबार जिल्हा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, नंदुरबार

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, नंदुरबार

Office of the District Collector and District Magistrate, Nandurbar

विषय: अक्षय तृतीया निमित्त बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृती अपील

अक्षय तृतीया हा सण शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो. मात्र या दिवशी नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी अल्पवयीन मुलांचे विवाह लावण्याची प्रथा आढळून येते. बालविवाह हा केवळ कायद्याने गुन्हा नसून तो मुलांच्या शिक्षण, आरोग्य व भविष्यातील अधिकारांवर घाला घालणारा गंभीर सामाजिक अन्याय आहे.

बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार १८ वर्षांखालील मुली व २१ वर्षांखालील मुलांचे विवाह करणे बेकायदेशीर आहे. अशा विवाहास प्रोत्साहन देणे किंवा त्यात सहभागी होणे देखील दंडनीय गुन्हा आहे. प्रत्येक मुलीला शिक्षण घेण्याचा, स्वप्न पाहण्याचा व सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे बालविवाहाची प्रथा थांबविणे हे केवळ प्रशासनाचेच नव्हे तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या परिसरात अक्षय तृतीया किंवा अन्य कोणत्याही प्रसंगी बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ खालील क्रमांकांवर संपर्क साधावा.

तक्रार निवारण क्रमांक:

चाइल्ड हेल्पलाईन – १०९८

पोलीस – ११२

#Nandurbar#CollectorOfficeNandurbar#StopChildMarriage#BalVivahBandh#ChildMarriagePrevention#WomenAndChildSafety#SocialAwareness#PublicAppeal#MaharashtraGov#DistrictAdministration#ChildRights#WomenEmpowerment#SayNoToChildMarriage

error: Content is protected !!
Exit mobile version