Home नंदुरबार जिल्हा राज्यपालपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवशी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी छत्रपती शिवाजी...

राज्यपालपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवशी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन केले.

On the first day after assuming office as Governor, Governor Jishnu Dev Verma paid tribute to Chhatrapati Shivaji Maharaj, Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, and Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar.

सर्वप्रथम राज्यपालांनी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी महापौर रितू तावडे उपस्थित होत्या.त्यांनतर राज्यपालांनी चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी राज्यपालांच्या उपस्थितीत त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली. यावेळी भन्ते राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे यावेळी उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभेचे प्रताप कांबळे, भिकाजी कांबळे व प्रतीक कांबळे यांनी राज्यपालांना संविधानाची प्रत भेट दिली.

त्यानंतर राज्यपालांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे भेट दिली सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर व खजिनदार मंजिरी मराठे उपस्थित होते. स्मारकाच्या वतीने राज्यपालांना सावरकरांची प्रतिमा तसेच सावरकर विषयक ग्रंथ भेट देण्यात आले.

error: Content is protected !!
Exit mobile version