Home महाराष्ट्र भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संरक्षण मंत्रालय

भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संरक्षण मंत्रालय

On the occasion of Republic Day of India, the Ministry of Defence

शिक्षण मंत्रालय आणि मायगव्ह (MyGov) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट वीर गाथा ५.०’ या राष्ट्रीय स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादन केले असून, देशातील ‘सुपर १००’ विजेत्यांमध्ये सर्वाधिक १९ विजेते महाराष्ट्राचे आहेत. या विजेत्यांमध्ये १४ मुली आणि ५ मुलांचा समावेश आहे.

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत २०२१ मध्ये सुरू झालेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या पराक्रमाची जाणीव करून देण्यासाठी राबविला जातो.

#प्रजासत्ताकदिन

error: Content is protected !!
Exit mobile version