(खान्देश) उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित “जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदे” तर्फे अहिराणी संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी खास ऑनलाईन कानबाई आरास सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रत्येक गावातील कानबाई बसवणारे ग्रुप किंवा परिवार सहभागी होऊ शकतात. यात पहिल्या तीन स्पर्धकांना बक्षीस देण्यात येईल. (Online Kanbai Aras Decoration Competition for all Khandesh residents)
1 . पहिले बक्षीस ₹ २५०१/-
2 . दुसरे बक्षीस ₹ १५०१/-
3. तिसरे बक्षीस ₹ १००१/-
https://forms.gle/eH8CJjKA4fXidzWX9
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रामुख्याने कुठल्याही प्रकारातले ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण होणार नाही तसेच कानबाई उत्सव संपूर्ण पर्यावरण पुरक ( इको – फ्रेंडली) स्वरूपात असणे आवश्यक आहे.
उत्सवात खान्देशातील पारंपरीक वाद्य वापरावीत. उदा. संबळ, डांग्या, डफडे वगैरे.
व्हिडिओ आडवा बनवावा… उभा व्हिडिओ परिक्षणासाठी विचारात घेतला जाणार नाही…
व्हिडिओ २.००(दोन) मिनिटाचाच असावा… त्या पेक्षा मोठा व्हिडिओ कुणीही पाठाऊ नये ही विनंती.
आपण केलेली सजावट, कानबाई व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसणे आवश्यक.
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. त्यावर कोणाची काहीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हिडिओ या वर्षातीलच हवेत.जूने व्हिडिओ ग्राह्य धरले जाणार नाही.
आपण साजरा करत असलेला कानबाई उत्सवाचे तारीख वेळ दाखविणारे फोटो / व्हिडिओ शेअर करावेत इतर ग्राह्य धरले जाणार नाहीत.
बक्षीस वितरण संदर्भात आपणास स्वतंत्र कळविण्यात येईल.
प्रशिक्षणानंतर सर्व व्हिडिओ उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या यूट्यूब वर लोड करण्यात येतील.
Mobile – 90824 49843
Mobile – 7710020069
Mobile – 98108903939