Home महाराष्ट्र महाराष्ट्रातील केवळ एक – दोन विद्यापीठांना आज राष्ट्रीय मानांकनात स्थान आहे.

महाराष्ट्रातील केवळ एक – दोन विद्यापीठांना आज राष्ट्रीय मानांकनात स्थान आहे.

Only one or two universities from Maharashtra are ranked in the national rankings today.

राज्यातील समूह विद्यापीठे नवीन असली तरीही त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये जुनी व नामांकित आहेत. त्यामुळे या विद्यापीठांनी राष्ट्रीय विद्यापीठ मानांकनामध्ये आपले मानांकन सुधारण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत, अशी सूचना राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी राज्यातील चार समूह विद्यापीठांच्या लोकभवन, मुंबई येथे आयोजित आढावा बैठकीत केली.

बैठकीला एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. हेमलता बागला, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. राजनीश कामत, सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रोव्होस्ट चंद्रकांत दळवी व कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के तसेच वारणानगर येथील वारणा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के तसेच विद्यापीठांचे अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version