अहिल्यानगर :- जिल्ह्यात खेळाचा प्रचार, प्रसार होऊन खेळाडूंची संख्या वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच शहरी व गावपातळीवर चांगले खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी ८ ते १४ वयोगटातील व वरिष्ठ गटातील खेळाडूंसाठी १० दिवसांचे प्राथमिक व अद्ययावत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक खेळाडूंनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी केले आहे.
दि. २८ एप्रिल ते ७ मे २०२६ या कालावधीत सकाळी ६ ते ८.३० व सायंकाळी ५ ते ७.३० या वेळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खो-खो या खेळाचे शिबिर बाणेश्वर क्रीडा मंडळ, बुऱ्हाणनगर व आबासाहेब काकडे विद्यालय, निर्मलनगर, शेवगाव येथे होणार आहे. बॅडमिंटन व कुस्ती खेळासाठी जिल्हा क्रीडा संकुल, अहिल्यानगर येथे शिबिर होईल.
जिल्हा क्रीडा प्रशिक्षण योजनेंतर्गत प्राथमिक व अद्ययावत प्रशिक्षण शिबिरात खो-खो, बॅडमिंटन, कुस्ती व कबड्डी या खेळांच्या अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवावा. प्रशिक्षण शिबिराच्या अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
#SportsTraining#SummerCamp2026#AhilyanagarSports#DnyaneshwarKhurange#KhoKho#Badminton#Wrestling#Kabaddi#YouthFitness#SportsSkillDevelopment#DistrictSportsOffice#TrainingHard#HealthyIndia#अहिल्यानगर#क्रीडा_शिबिर#खेळाडू_प्रशिक्षण#कुस्ती#खोखो#बॅडमिंटन
