Home आरोग्य ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियानांतर्गत महिलांच्या आरोग्य तपासणी व जनजागृती कार्यक्रमाचे...

‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियानांतर्गत महिलांच्या आरोग्य तपासणी व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

Organizing women's health check-up and awareness program under the 'Healthy Women - Strong Families' campaign

तळवे (ता. शहादा) उपकेंद्र तळवे अंतर्गत अंगणवाडी तळवे येथे ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ या अभियानांतर्गत महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात महिलांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच कुष्ठरोग आणि क्षयरोग यांसारख्या गंभीर आजारांबद्दल जनजागृती करून वेळेवर निदान आणि उपचाराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी शासकीय यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्यविषयक योजना आणि उपक्रमांची सविस्तर माहिती महिलांना देण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या ‘अमृत आहार’ या पौष्टिक आहाराच्या महत्त्वाविषयीही विशेष मार्गदर्शन करण्यात आले. बालकांचे पालक तसेच गरोदर मातांना अमृत आहारामुळे होणारे आरोग्यवर्धक फायदे समजावून सांगण्यात आले.

स्थानिक आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी सेविका यांच्या सहभागातून पार पडलेल्या या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यास मोठी मदत झाली असून, ‘सशक्त महिला – सशक्त परिवार’ या संकल्पनेला नवा बळ मिळाला आहे.

#स्वस्थनारीसशक्तपरिवार#आरोग्यजागृती#कुष्ठरोग#क्षयरोग#अमृतआहार#अंगणवाडी#nandurbar#HealthAwareness#womenempowerment2025

error: Content is protected !!
Exit mobile version