Home शैक्षणिक सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये घडलेला पेपर चोरीचा गुन्हा उघड – शालेय शिक्षण विभागाचे...

सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये घडलेला पेपर चोरीचा गुन्हा उघड – शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

Paper theft case at Sangola Vidyamandir School exposed – School Education Department clarifies

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील कस्टडी रुममध्ये ठेवलेले इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचे पेपर 17 मार्च 2026 रोजी अज्ञात इसमाने चोरुन नेल्याबाबत सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा एका अल्पवयीन विधि संघर्षग्रस्त बालकाने केल्याचे उघड झाले असल्याचे सांगोला पोलिसांकडून कळविण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

या अनुषंगाने सांगोला पोलीस ठाण्याकडून करण्यात आलेल्या तपासानुसार हा गुन्हा एका अल्पवयीन विधि संघर्ष ग्रस्त बालकाने केल्याचे उघड झाले आहे. त्याने गुन्हा केल्याबाबत कबुली दिलेली असून गुन्हा करताना वापरलेले इलेक्ट्रिक कटर, इलेक्ट्रिक मोटार सायकल, चोरीस गेलेले इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेच्या प्रश्न पत्रिका व तीन कोऱ्या उत्तर पत्रिका जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती सांगोला पोलीसांकडून देण्यात आल्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version