Home नंदुरबार जिल्हा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त राज्यभरात ‘पराक्रम दिन’,राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त राज्यभरात ‘पराक्रम दिन’,राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन

1
'Parakram Din' (Day of Valour) and state-level essay, elocution, and Reels competitions are being organized across the state to mark the birth anniversary of Shrimant Thorle Bajirao Peshwa.

नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी’ (अमृत), पुणे यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 18 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण राज्यभरात ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा, अद्वितीय युद्धनीतीचा आणि राष्ट्रनिष्ठेचा परिचय नवीन पिढीला व्हावा, या उद्देशाने 1 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या पराक्रम दिनानिमित्ताने शाळा, महाविद्यालये तसेच खुल्या गटातील नागरिकांसाठी विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन ‘अमृत’ संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. या उपक्रमासाठी ‘अमृत’ संस्थेमार्फत ‘पराक्रम दिन समिती’ स्थापन करण्यात आलेली असून, या समितीत काकासाहेब विधाते, पांडुरंग बलकवडे, जगन्नाथ लडकत, मोहन शेटे, मंगेश खाडिलकर व सौ. कौमुदी परांजपे या दिग्गज इतिहासतज्ज्ञ आणि अभ्यासकांचा समावेश आहे.
स्पर्धांचे स्वरूप व गट: निबंध स्पर्धा (शालेय, महाविद्यालयीन व खुला गट): नियम: जास्तीत जास्त 100 शब्दांची मर्यादा. निबंध मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत टाईप करून त्याची पीडीएफ (PDF) फाईल अपलोड करावी. निबंधासाठी लागणारे संदर्भ ‘अमृत पराक्रम दिन’च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीवरच आधारित असावेत. वक्तृत्व स्पर्धा (शालेय, महाविद्यालयीन व खुला गट): नियम: स्वभाषणातील जास्तीत जास्त 7 मिनिटांचा सुस्पष्ट व्हिडिओ सादर करणे अपेक्षित आहे. व्हिडिओ ओरिजिनल असावा आणि त्यात कोणतेही व्हिज्युअल/साउंड इफेक्ट्स किंवा AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) जनरेटेड इमेजेस वापरू नयेत. रील्स / शॉट्स स्पर्धा (महाविद्यालयीन व खुला गट): नियम: विषयाला अनुसरून 2 ते 3 मिनिटांपर्यंतची रील्स स्वतःच्या आवाजात सुयोग्य लोकेशनवर शूट करून सादर करावी. स्पर्धेचे सामायिक विषय: 18 व्या शतकातील हिंदवी साम्राज्य विस्तारक थोरले बाजीराव पेशवे