Home तळोदा माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे पालक मेळावा संपन्न

माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे पालक मेळावा संपन्न

0
Parent-Teacher Meeting Held at Madhyamik Vidyalaya, Tulaja

तळोदा(प्रतिनिधी):-22 जून रोजी माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 
तसेच माजी प. स सदस्य सीताराम रहासे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जसे की विद्यार्थी उपस्थिती, दहावीच्या बोर्ड परीक्षा. व त्याचे महत्व तसेच बेस्ट five या बोर्डाकडून सुरू असलेल्या योजनेचे महत्त्व तसेच इतरही विषयावर मार्गदर्शन करण्यात आले  यावेळी सीताराम रहासे यांनी आपल्या भागातील 
अधिकारी अजय खर्डे तसेच 
P.s.I दुर्गा खर्डे याचे उदाहरण 
देऊन पालकांनी आपल्या पाल्यांना 
दररोज शाळेत पाठवण्याचे आवाहन केले. तसेच मुख्याध्यापक उमेश पाटील यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. असे सांगितले.
यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते व महिला पालकांची 
संख्या चांगली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र ढोडरे यांनी केले तर आभार विलास मगरे यांनी मानले. या कार्यक्रमाला यशस्वी 
करण्यासाठी भील, मोरे,
पाडवी, साळुंखे, पंकज खेडकर तसेच संतोष राठोड, मोहन वळवी आणि सुबोध जावरे यांनी परिश्रम घेतले.