राजापूर(प्रतिनिधी):- संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी व नगर पंचायत देवरुख तायक्वांदो क्लब आयोजित रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो क्युरोगी व पुमसे स्पर्धा 2026 मोठ्या उत्साहात पार पडली सदर स्पर्धेत ओणी गावातील कु. परी संजय जड्यार हिने जुनियर गटात (42 वजनी गटात) क्युरोगी (फाईट) प्रकारात सुवर्ण पदक व बेस्ट फायटर हा ‘किताब पटकावला. याबद्दल तिचे व तिच्या गुरुजणांचे व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन. केले जात आहे. परी हिला तिचे गुरु मुकेश नाचरे, प्रशांत कांबळे, हर्षराज जड्यार, श्रीमती नाचरे आणि सहकारी खेळाडू आणि आई पायल जड्यार आदींचे मार्गदर्शन लाभले. संजय विष्णू जड्यार महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजापूर तालुका सचिव यांची परी ही कन्या आहे. तिच्या निर्भेळ यशाबद्दल सर्व थरातून कौतुक होत आहे.
