Home नंदुरबार जिल्हा देवमोगरा माता मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दर्शन : जनजातीय गौरव दिनी विशेष...

देवमोगरा माता मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दर्शन : जनजातीय गौरव दिनी विशेष भेट

Prime Minister Narendra Modi visits Devmogra Mata Temple: Special visit on Tribal Pride Day

देवमोगरा माता मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दर्शन : जनजातीय गौरव दिनी विशेष भेट

तळोदा प्रतिनिधी – 

भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आज देशभरात जनजातीय गौरव दिवस साजरा करण्यात येत असताना, भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी आदिवासींचे श्रद्धास्थान देवमोगरा माता मंदिरात येऊन दर्शन घेतले. पंतप्रधानांच्या या भेटीमुळे परिसरात श्रद्धा, उत्साह आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले.

पंतप्रधान मोदी यांनी देवमोगरा मातेला देशातील सर्व नागरिकांच्या उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि प्रगतीची प्रार्थना केली. मंदिर परिसरात झालेल्या या विशेष घटनास्थळी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की,

“आज भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीसारख्या पवित्र दिवशी देवमोगरा माता दर्शनाचा लाभ मिळणे माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. माता आपल्या सर्वांवर कृपा ठेवो. माझा आग्रह आहे की देशवासीयांनी येथे येऊन दर्शने घ्यावीत आणि माता देवीचे आशीर्वाद प्राप्त करावेत.”

पंतप्रधानांच्या आगमनामुळे आदिवासी जनजातीय समाजातही मोठा उत्साह असून स्थानिक स्तरावर ही घटना ऐतिहासिक ठरल्याचे मानले जात आहे. देवमोगरा माता मंदिर परिसरात सुरक्षेची काळजी घेऊन व्यवस्था करण्यात आली होती.

या भेटीद्वारे पंतप्रधान मोदी यांनी जनजातीय समाजाच्या परंपरा, श्रद्धा व सांस्कृतिक वारशाबद्दल असलेल्या श्रद्धेचे पुनरुच्चार केले.

error: Content is protected !!
Exit mobile version