Home महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी महाराष्ट्र राज्य एड्स...

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या (#MSACS) कार्याचा सविस्तर आढावा घेतला.

Public Health and Family Welfare Minister Prakash Abitkar took a detailed review of the work of the Maharashtra State AIDS Control Society (#MSACS).

या आढावा बैठकीत राज्यभरातील एचआयव्ही प्रतिबंध, उपचार आणि जनजागृतीसंबंधी उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीत एचआयव्ही उपचार पद्धती, जनजागृती मोहिमा आणि संवेदनशील समुदायांपर्यंत प्रभावी सेवा पोहोच‍‍विण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ.सुनिल भोकरे, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड तसेच वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version