Home तळोदा तळोदा आमलाड येथील विद्यागौरव शैक्षणिक संस्थेत रक्षाबंधन उत्साहात साजरा

तळोदा आमलाड येथील विद्यागौरव शैक्षणिक संस्थेत रक्षाबंधन उत्साहात साजरा

Rakshabandhan at Aamlad Taloda

(तळोदा) तळोदा तालुक्यातील विद्यागौरव स्कूल ज्युनियर कॉलेज,आमलाड येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा झाला.  (Nandurbar News)

विद्यागौरव प्रायमरी व गौरव सेकंडरी इंग्लिश मेडियम स्कूलचा उपक्रम

विद्यागौरव प्रायमरी व गौरव सेकंडरी इंग्लिश मेडियम स्कूल येथे रक्षाबंधन निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनविणे, तसेच चिमुकल्या बहिणींनी आपल्या वर्गातील भावांना स्वतः तयार केलेल्या राख्या बंधल्या व भावांनी आपल्या बहिणींना कॅडबरी, पेन इत्यादी भेट म्हणून भेटवस्तू दिल्या. ( नंदुरबार न्युज )

Rakshabandhan at Aamlad Taloda

स्काऊट-गाईडच्या विद्यार्थिनींचा झाडांना राखी बांधून वृक्षारोपण व वृक्ष संगोपन करण्याचा संकल्प

तसेच स्काऊट गाईड शिक्षक पुलायन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट-गाईडच्या विद्यार्थिनींनी झाडांना राखी बांधून वृक्षारोपण व वृक्ष संगोपन करण्याचा संकल्प केला. प्रास्तविक व सूत्रसंचालन शिक्षिका प्रीती बुनकर यांनी केले. कार्यक्रमाला ललित पाठक सर, विश्वास पवार सर व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या बहिणीच्या पायांवर डोके टेकून आशिर्वाद घेतले. चिमुकल्यांनी बांधलेल्या राख्या आकर्षक ठरल्या.

error: Content is protected !!
Exit mobile version