अक्राणी तालुका | छापरी, नंदुरबार |
राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य (श्रीअन्न) उप-अभियान 2025-26 च्या अनुषंगाने छापरी गावात नागली पिकाचे सलग क्षेत्रावरील गट प्रात्यक्षिक व बियाणे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शेतकरी निवड, नागली बियाण्यांचे वाटप तसेच पीक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले.
उपस्थित मान्यवर व मार्गदर्शन:
आर. एम. शिंदे – तालुका कृषी अधिकारी, अक्राणी
एन. डी. पाडवी – मंडळ कृषी अधिकारी
भरत पावरा, सचिन पावरा – सहाय्यक कृषी अधिकारी

या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, कीड-रोग व्यवस्थापन, आणि नागली पिकाच्या पोषणमूल्यांविषयी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट:
⦁ नागली पिकाचा प्रसार व उत्पादकता वाढवणे
⦁ सलग क्षेत्रात एकत्रित लागवडीतून तंत्रज्ञान सुलभ करणे
⦁ शेतकऱ्यांना आर्थिक आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम बनवणे
⦁ श्रीअन्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागलीच्या पोषणमूल्यांची जाणीव वाढवणे
प्रमुख मार्गदर्शन विषय:
⦁ राष्ट्रीय कृषि विकास योजना आणि श्रीअन्न उप-अभियानाची माहिती
⦁ नागली लागवडीचे सुधारित पद्धती
⦁ कीड व रोग व्यवस्थापन
⦁ नागली पिकाचे आहारातील महत्त्व
या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना नवीन ज्ञान, बीज व आधुनिक पीक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. नागलीसारख्या पौष्टिक तृणधान्याचे प्रसार व जागरूकता वाढवून शेतकऱ्यांचा आर्थिक लाभ व पोषण सुरक्षिततेकडे वाटचाल अधिक मजबूत होणार आहे.
.#ShriAnna#NandurbarAgriculture#MilletMission#NagaliDemo#RKVY#NutritionalSecurity#FarmersTraining#AkraniTaluka#ShetkariSamvad