Home क्रीडा स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्थेतर्फे रत्नागिरी जिल्हास्तरीय कलागुण विकास स्पर्धा

स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्थेतर्फे रत्नागिरी जिल्हास्तरीय कलागुण विकास स्पर्धा

0
Ratnagiri District-Level Art and Talent Development Competition organized by Swamini Social Skill Development Organization

चिपळूण(प्रतिनिधी):-MY भारत, रत्नागिरी आणि स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हास्तरीय कलागुण विकास स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेचे विषय संगीत (लोकगीते) नशा मुक्त आधारित/स्थानिक भाषा/ शक्य असल्यास आधुनिक वाद्यांचा वापर, नुक्कड नाटक मुकाभिनय व्यसनांचे दुष्परिणाम आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणारा नाट्य प्रयोग, वादविवाद वक्तृत्व अंमली पदार्थांचे संकट समूळ नष्ट करण्यात तरुणांची भूमिका, घोषवाक्य लेखन माय भारत पोर्टलवर थेट पोस्ट केलेल्या प्रभावी घोषणा, नृत्य सांघिक स्पर्धा शास्त्रीय, लोक किंवा समकालीन शैलीतील नृत्य प्रयोग सादर करणे चित्रकला स्पर्धा अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम आणि अमली पदार्थमुक्त भारताचे स्वप्न दाखवणारी कलाकृती. लघुपट / रील स्पर्धा माय भारत पोर्टलद्वारे अपलोड केलेले‌ 60 सेकंदाचे डिजिटल फर्स्ट शाॅर्ट, शाॅर्ट फिल्म, स्लॅम पोएट्री व्यसनाधीनते विरुद्ध तरुणांचा आवाज, तुमच्या पिढीचा आवाज टिपणारी 3-5 मिनिटांची मूक काव्यरचना सादर करणे अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सदर स्पर्धा शुक्रवार 31 जुलै 2026 रोजी एकाच वेळी होणार असून स्पर्धेचे वेळ व ठिकाण कळविण्यात येईल असे स्वामिनी संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी सौ. स्वरा सावंत ९८९०३६९८४८ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.