राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मान्यता देण्यात आली असून वित्त विभागाकडूनही आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानपरिषदलक्षवेधी
मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सेंट्रल पार्क’ उभारण्यात येत असून या प्रकल्पाच्या जागेचे व्यापारीकरण होणार नसल्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. या शहरात अमेरिकेतील किंवा लंडनमधील प्रसिद्ध उद्यानांपेक्षाही अधिक आकर्षक आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे असे उद्यान उभे राहावे, या उद्देशाने हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाबाबत मुंबईतील लोकप्रतिनिधींच्या सूचना आणि मते विचारात घेतली जाणार आहेत. स्थानिक आमदारांकडून प्राप्त लेखी सूचनांचा अभ्यास करून त्यातील योग्य बाबींचा समावेश केला जाईल.
विधानपरिषदलक्षवेधी
सहकार चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून ती अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
चालू वर्षी राज्यात पाऊस दीर्घकाळ पडल्याने तसेच काही भागांत पूरस्थिती निर्माण झाल्याने काही ठिकाणी ऊसाच्या वजनात घट झाल्याचे आढळून आले आहे. काटामारी व रिकव्हरी चोरीच्या तक्रारींवर नियंत्रण ठेवण्यासाठी साखर आयुक्तालयामार्फत जिल्हास्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच वैधमापन विभागामार्फत हंगाम सुरू होण्यापूर्वीच वजनकाट्यांची तपासणी करून त्यांना सील करण्यात येते, असे सहकार मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
यासंदर्भातील सविस्तर वृत्त वाचा
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६#अर्थसंकल्पीयअधिवेशन#MahaBudgetSession#MahaBudgetSession2026
