Home नंदुरबार जिल्हा नंदुरबारातील विविध भागांमध्ये खाली लॉबकळत असलेले वीजतारे तातडीने सुरक्षित उंचीवर करण्याबाबतचे, शाखा...

नंदुरबारातील विविध भागांमध्ये खाली लॉबकळत असलेले वीजतारे तातडीने सुरक्षित उंचीवर करण्याबाबतचे, शाखा अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित शाखा कार्यालय, नंदुरबार यांन

1
Regarding the immediate raising of the power lines hanging down in various parts of Nandurbar to a safe height, Branch Engineer Maharashtra State Electricity Distribution Company Limited Branch Office, Nandurbar

नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार शहरातील विविध भागांमध्ये खाली लॉबकळत असलेले वीजतारे तातडीने सुरक्षित उंचीवर करण्याबाबतचे
निवेदन शाखा अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित शाखा कार्यालय, नंदुरबार यांच्याकडे पालिकेचे उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी यांनी देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे. नंदुरबार शहरातील विविध प्रभागांमधील नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार अनेक ठिकाणी वीजवाहिन्यांचे तारे अत्यंत खाली लोंबकळत असल्याचे निदर्शनास आले आहे, सदर परिस्थितीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून पादचारी, दुचाकी व चारचाकी वाहनचालक तसेच मोठ्या वाहनांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. सध्या पावसाळ्याचा कालावधी सुरू असल्याने शॉर्टसर्किट होणे, वीजतारे तुटणे, विद्युत धक्का लागणे तसेच इतर अपघात घडण्याची शक्यता अधिक वाढली आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.
याशिवाय, आगामी गणेशोत्सव लक्षात घेता शहरातील विविध भागांमध्ये गणेशमूर्ती स्थापना, मिरवणुका, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येणार आहेत. या कालावधीत नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने खाली असलेले वीजतारे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे आपण संबंधित अधिकाऱ्यांमार्फत शहरातील अशा सर्व ठिकाणांची तातडीने पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी वीजतारे नियमानुसार सुरक्षित उंचीवर करण्याची कार्यवाही करावी. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी आवश्यक ती कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी,
नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने सदर विषयाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नंदुरबार पालिकेचे उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी यांनी शाखा अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण), शाखा कार्यालय, नंदुरबार यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.