Home आरोग्य बिडी कामगारांना दिलासा; सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी सुरू

बिडी कामगारांना दिलासा; सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी सुरू

1
Relief for bidi workers; implementation of revised minimu

किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत पहिल्या अनुसूचीतील तंबाखू (बिडी निर्माणसह) वस्तुनिर्माणातील अनुसूचित उद्योगातील बिडीकामगार यांच्या प्रलंबित किमानवेतन दराचा प्रश्न अखेर पूर्णपणे मार्गी लागला आहे. कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि पुढाकारामुळे बिडी कामगारांच्या थकीत किमान वेतनाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने शासनाने बिडी कामगारांच्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी करण्याचे व फरकाची तसेच थकबाकीची वसुलीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.