नंदुरबार जिल्ह्यात पोलीस अधिकारी/अंमलदार, विविध शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात हेल्मेटचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. हेल्मेट वापरणाऱ्या वाहनधारकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात येत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या वाहनधारकांवर तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार आणि इतर शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही विशेष व कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. विना हेल्मेट आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर दंड आकारून पावती देण्यात येत आहे.
दररोज वाढत असलेले रस्ते अपघात, डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापती आणि मौल्यवान जीवितहानी टाळण्यासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
हेल्मेट हा केवळ कायद्याचा नियम नाही – तो तुमच्या जीवाचे रक्षण करणारे सुरक्षा कवच आहे.
• हेल्मेट न घातल्यास तात्काळ दंड आकारण्यात येईल.
• ई-चलन (E-Challan) नोंदवले जाईल.
• वारंवार नियमभंग करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
लक्षात ठेवा – तुमच्या घरी कोणी तरी तुमची वाट पाहत आहे.
फक्त एका क्षणाची सावधगिरी तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा भविष्यातील आनंद सुरक्षित ठेवू शकते.
