Home नंदुरबार जिल्हा दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या तरुणांची चौकशी करून गुन्हा नोंद करा :...

दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या तरुणांची चौकशी करून गुन्हा नोंद करा : हिंदुत्ववादी संघटनेची मागणी

taloda news
taloda news

(तळोदा) तळोदा येथील शिक्षक सागर कुकावलकर यास नंदुरबार येथे मुस्लिम समाजातील ४० ते ५० तरुणांनी एकटे गाठून बेदम मारहाण केली आहे.या मारहाणीस कारणीभूत असणारे तळोद्यातील दोन मुस्लिम तरुण कारणीभूत आहेत.ज्यांनी सागर कुकावलकर याचा फोटो चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे,असे हिंदुराष्ट्र सेना व हिंदुत्ववादी संघटनेचे म्हणणे आहे. सदर घटनेस कारणीभूत असणाऱ्यांची चौकशी करून त्यांवर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा.याबाबत दि २६ रोजी तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना निवेदन देण्यात आले.
हिंदुराष्ट्र सेना व हिंदुत्ववादी संघटनेचे निवेदनात म्हटले आहे की, दिनांक २३/०७/२०२३रोजी दु ३:०० ते ३: ३०च्या सुमारास तळोदा आयटीआय येथे नोकरी करणारे सागर कुकावलकर यांच्या सोबत शाळेत शिक्षिका असलेली मुस्लिम महिला दोघे तळोदा बस स्थानकाकडे पायी चालत असताना बन्साली प्लाझा, बद्री कॉलनी जवळ तळोदा शहरातील दोन मुस्लिम तरुणांनी सागर यास हटकले.जोर- जबरदस्ती करून धक्काबुक्की केली. तसेच दोघांचे फोटो काढून नंदुरबार जिल्ह्यातील मुस्लिम तरुणांच्या ग्रुप मध्ये प्रसारित करतो म्हणून धर्माविषयी सुद्धा उलट सुलट शब्दाचा वापर केला. सागर व आयटीआय मधील शिक्षिका नंदुरबार बस मध्ये बसले. नंदुरबार सी बी पेट्रोल पंप जवळ 30 ते 50 मुस्लिम तरुणांचा जमाव घेऊन सागरला बेदम मारहाण केली. त्यासंबंधित नंदुरबार पोलीस स्टेशन गुन्हा नोंद झाला असून काही तरुण अटकेत आहेत. अशा स्थितीत तळोदे शहरातील कोणते दोन तरुण ज्यांनी फोटो काढून मुस्लिम समाजाच्या ग्रुपमध्ये प्रसारित केला. प्रसारित करून दोन समाजात गैरसमज व तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला व नंदुरबार जिल्ह्यातील वातावरण असम करण्याच्या प्रयत्न करीत आहे. अशा दोन्ही तरुणांवर गुन्हा नोंद करण्यात यावा. अन्यथा हिंदू समाज सनदशीर मार्ग आंदोलन करत राहील,याची नोंद घ्यावी.

निवेदन देतेवेळी हिंदुराष्ट्र सेना तालुकाध्यक्ष किरण ठाकरे, जिल्हा सचिव राहुल जैन, जिल्हा उपाध्यक्ष पारस परदेशी, अमन जोहरी, पवन भोई, कार्तिक शिंदे, योगेश चव्हाण, आकाश दिगवा, पराग राणे, आकाश भोई, छोटू चित्ते, राकेश चौधरी, शिवम सोनार, दिपेश जैन, भुषण राठोड, चिंटू जोहरी, नंदराज राजपूत, रोहन चौधरी, तुषार पाटील, भुषण कोळी, सौरव कलाल, रोहित नाना उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version