Home महाराष्ट्र प्रशासकीय क्षमता वृद्धीसाठी ‘साधना सप्ताह’ उपक्रम

प्रशासकीय क्षमता वृद्धीसाठी ‘साधना सप्ताह’ उपक्रम

'Sadhana Saptah' initiative for enhancing administrative capacity

महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित दूरचित्रवाणी परिषदेद्वारे (VC), राज्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकासासाठी दिनांक ०२ एप्रिल ते ०८ एप्रिल, २०२६ या कालावधीत ‘साधना सप्ताह’ राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

उपक्रमाची पार्श्वभूमी व उद्दिष्ट: भारत सरकारचा क्षमता विकास आयोग (CBC) आणि ‘कर्मयोगी भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. प्रशासकीय कामात अधिक व्यावसायिकता, गतीशीलता आणि तांत्रिक कौशल्य आत्मसात करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

सप्ताहांतर्गत प्रमुख कार्यवाही:

iGOT कर्मयोगी पोर्टल: सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी iGOT कर्मयोगी पोर्टलवरील विहित कोर्सेस पूर्ण करणे अनिवार्य आहे.

नियत कालावधी: सदर ऑनलाइन कोर्सेस दिनांक ०२ एप्रिल ते ०८ एप्रिल, २०२६ या मर्यादित कालावधीतच पूर्ण करावयाचे आहेत.

क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणी: जिल्ह्यातील सर्व अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांनी या सप्ताहात सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी सविस्तर सूचना निर्गमित केल्या आहेत.

प्रशस्तीपत्र व गौरव: iGOT पोर्टलवरील आकडेवारीनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालय प्रमुखांना मे २०२६ मध्ये आयोजित “TECH-वारी २.०” या राज्यस्तरीय कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.

#MissionKarmyogi#SadhanaSaptah#CapacityBuilding#DigitalGovernance#MaharashtraAdministration#iGOTKarmyogi#GoodGovernance#TechWari

error: Content is protected !!
Exit mobile version