
(नंदुरबार) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलमाअन्वये गृहनिर्माण संस्थांवर प्रशासक नेमणूक करण्यासाठी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग यांनी अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवारांनी 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहकारी संस्था नाशिक विभाग विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
प्रशासक नेमणूकीसाठी राज्य शासनाच्या गट ‘अ’ व ‘ब’ मधील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. ॲण्ड ए.)/ उच्चतम सहकार पदविका (एच.डी.सी.) धारक, चार्टर्ड अकाउंटंट (सी.ए.)/इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट ॲण्ड वर्क्स अकाउंटंट (आय.सी.डब्ल्यू.ए.)/कंपनी सेक्रेटरी (सी.एस.), सहकार खात्यातील प्रशासन/लेखा प्रशासन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी, नागरी कर्मचारी सहकारी बँकांमध्ये व्यवस्थापक, कायद्याची पदवीधारक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
यासाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज उपलब्ध असून सदर अर्ज परिपूर्ण भरुन त्याच कार्यालयात सादर करावे, असेही विभागीय सहनिबंधक श्री. निकम यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.