मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत ‘मिशन लक्ष्यवेध’अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवड प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी घडवणे हा आहे.
या उपक्रमांतर्गत वेटलिफ्टिंग, लॉन टेनिस, शूटिंग व टेबल टेनिस या क्रीडा प्रकारांसाठी विभागीय स्तरावर निवड चाचण्या आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड प्रक्रियेदरम्यान तज्ञ प्रशिक्षकांमार्फत खेळाडूंचे कौशल्य परीक्षण करण्यात येणार असून निवड झालेल्या खेळाडूंना प्रगत प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शन दिले जाणार आहे.
निवड चाचणी तपशील पुढीलप्रमाणे :
१) वेटलिफ्टिंग
ठिकाण : तालुका क्रीडा संकुल, कोपरी, ठाणे
संपर्क प्रमुख : श्रीमती हिमानी परब
मोबाईल : ८३६९७१६०४६
दिनांक : ०६ एप्रिल २०२६ | वेळ : सकाळी ८.०० वा.
२) लॉन टेनिस
ठिकाण : महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन, कुपरेज क्लब, मुंबई
संपर्क प्रमुख : श्रीमती प्रीती टेमघरे
मोबाईल : ९०२९२५०२६८
दिनांक : ०७ एप्रिल २०२६ | वेळ : सकाळी ८.०० वा.
३) शूटिंग
ठिकाण : कामगार कल्याण मंडळ, दादर, मुंबई
संपर्क प्रमुख : श्रीमती नेहा साप्ते
मोबाईल : ९९६९९७२०२२
दिनांक : ०८ एप्रिल २०२६ | वेळ : सकाळी ८.०० वा.
४) टेबल टेनिस
ठिकाण : नवी मुंबई स्पोर्ट्स अँड सामाजिक विकास मंडळ, पनवेल
संपर्क प्रमुख : श्री. नीलकंठ आखाडे
मोबाईल : ९९६७२७७०८२
दिनांक : ०९ एप्रिल २०२६ | वेळ : सकाळी ८.०० वा.
या निवड चाचण्यांसाठी २५ वर्षांखालील खेळाडू पात्र असून, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतलेला अनुभव आवश्यक आहे.
इच्छुक खेळाडूंनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
ई-मेल : missionlakshvedhamumdiv@gmail.com
अर्ज लिंक : https://forms.gle/2f7ypkikdUBKNf7fA
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ मार्च २०२६
अर्जासोबत जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, क्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट व पालक संमतीपत्र जोडणे आवश्यक आहे. निवड चाचणीच्या दिवशी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांच्या कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
