Home अक्कलकुवा अक्कलकुवा एस. टी. कामगार संघटनेचा अध्यक्षपदी शकील पिंजारी यांची निवड

अक्कलकुवा एस. टी. कामगार संघटनेचा अध्यक्षपदी शकील पिंजारी यांची निवड

Shakeel Pinjari elected as the president of Akkalkuwa S. T. Workers' Association

अक्कलकुवा आगार येथे महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेची २०२६ साठी आगार कार्यकारिणी निवड व बैठक विभागीय सचिव संतोषभाऊ वाडिले यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी सर्व कामगारांच्या एकमताने आगाराचा अध्यक्ष पदासाठी शकील शब्बीर पिंजारी व आगार सचिव पदासाठी गणेश मराठे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
     या प्रसंगी विभागाकडून निवडणूक निरीक्षक म्हणून  संतोषभाऊ वाडीले,  राजेंद्र पवार, ज्ञानेश्वर पैठणे यांनी अध्यक्ष निवड व पदाधिकारी चे निवडीचे बैठकीचे काम पाहिले.
सदर या निवडीचा कार्यक्रमाला बहुसंख्य कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विभा.सचिव  संतोषभाऊ वाडिले यांनी आगाराचे सभासदांच्या येणाऱ्या विविध अडीअडचणी समजून घेत, सदर अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी याप्रसंगी योग्य ते मार्गदर्शन केले.
    कार्यक्रमाचे शेवटी आभारप्रदर्शन मनोजभाऊ खैरनार यांनी केले. बिनविरोध निवड झालेल्या मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या

सदर या निवडी प्रसंगी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना,
युनिट-अक्कलकुवा आगाराचे कर्मचारी चेतन सोनार, संदीप जावरे, तोसीब शेख, मोहन चव्हाण, शरद वसावे, मनोज खैरनार, पी. जी. सोनवणे, डि. ए. भदाणे, वसावे भाऊ, भोपे भाऊ, संगपाल भाऊ, प्रविण खराडे, रामचंद्र पंडित आदीसह महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना युनिट अक्कलकुवा आगाराचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version