
ता.शहादा जि.नंदुरबार
मंडळ भाग ब्राम्हणपुरी अंतर्गत मौजे ब्राम्हणपुरी (ता. शहादा) येथील जि.प. शाळेत श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात श्री. माधवराव पाटील, श्री. भगवान शंकर पाटील, मंडळ अधिकारी श्री. मधुकर सुर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. लक्ष्मण कोळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती सुरेखा राठोड (ग्राम महसूल अधिकारी, ब्राम्हणपुरी) यांनी केले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक व संबंधित विभागांचे अधिकारी/कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.
#शासनआपल्या-दारी # श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्वअभियान #महाराष्ट्रशासन#महसूलविभाग#जिल्हाधिकारीनंदुरबार
#शहादा तहसील #ब्राम्हणपुरी