जिल्ह्यात सिकलसेल तपासणी मोहीमेची सुरुवात; 8 लाख नागरिकांची तपासणी होणार!
Sickle cell screening campaign begins in the district; 8 lakh citizens will be screened!
सिकलसेल आजार निर्मूलनासाठी महत्त्वाकांक्षी मोहीम नंदुरबार जिल्ह्यात सुरू!
राज्याचे कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव काकाटे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्र्यांनी स्वतः सिकलसेल आजाराची तपासणी करून मोहीम सुरू केली.
पुढील दोन वर्षांत 0 ते 40 वयोगटातील 8 लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन मिशन अंतर्गत हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, आतापर्यंत 3.90 लाख नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. आता उर्वरित नागरिकांना या तपासणीसाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
उपस्थित मान्यवर:
खासदार: ॲड. गोवाल पाडवी
माजी मंत्री व आमदार: डॉ. विजयकुमार गावित
आमदार: अमशा पाडवी, शिरीष नाईक, राजेश पाडवी
जिल्हाधिकारी: मित्ताली सेठी
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद: सावन कुमार
जिल्हा पोलीस अधीक्षक: श्रवण दत्त एस.
सहाय्यक जिल्हाधिकारी: अनय नावंदर
नियोजन अधिकारी: शशांक काळे
डॉ. संजय राठोड (अधिष्ठाता), डॉ. वर्षा लहाडे (जिल्हा शल्य चिकित्सक), डॉ. रविंद्र सोनवणे (जिल्हा आरोग्य अधिकारी)
जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित: डॉ. अभिजित मोरे, मधुकर पाटील, निखिलकुमार तुरखिया, निलेश माळी, मकरंद पाटील, सत्यानंद गावित, किरसिंग वसावे, विजयसिंग पराडके, ॲड. राम रघुवंशी
तपासणी व उपचार सुविधा:
रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपचार व समुपदेशन
सिकलसेल वाहकांमध्ये जनजागृती अभियान
अपंगत्व प्रमाणपत्र व मोफत रक्तपुरवठा कार्ड योजना
पालकमंत्री ॲड. माणिकराव काकाटे यांचे आवाहन:
“सिकलसेल आजाराचे निर्मूलन हे आपले उद्दिष्ट आहे. प्रत्येक नागरिकाने तपासणी करून सहकार्य करावे व आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवावे.”
जिल्ह्यातील नागरिकांनी या मोहीमेत सक्रिय सहभाग घ्यावा!