शहादा तालुक्यातील काथर्दे खुर्द येथे दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी मा. सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांनी पाहणी दौरा केला.
या दौऱ्यात त्यांनी घरकुल योजनेसाठी योग्य जागेची पाहणी केली तसेच गट क्र. १२३ व १२६ मधील उत्खनना संदर्भात चौकशी करून संबंधित बाबींची माहिती घेतली.
स्थानिक स्तरावर नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय योजनांचा योग्य प्रकारे लाभ मिळावा, तसेच उत्खनना संदर्भातील सर्व बाबींचा सखोल आढावा घेऊन पुढील आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले. या पाहणीत स्थानिक प्रशासन अधिकारी उपस्थित होते.
#nandurbar#shahada#घरकुलयोजना#जिल्हाप्रशासन#development#inspection#administration
