नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने प्राथमिक शिक्षण विभाग व जिल्हा प्राथमिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन गरुडझेप’ अंतर्गत ‘मिशन परिवर्धा’ उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याच्या उद्देशाने सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
यावर्षी प्रथमच इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप समजावे, स्पर्धात्मक वातावरणाची जाणीव व्हावी आणि परीक्षेची भीती दूर व्हावी या हेतूने ही सराव परीक्षा घेण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले.
केंद्र प्रमुख अशोक देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव परीक्षेचे काटेकोर नियोजन करण्यात आले. परीक्षेसाठी मुख्य परीक्षेच्या धर्तीवर A व B सेटच्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या असून OMR उत्तरपत्रिकांचा वापर करण्यात आला. केंद्रसंचालक अमृत पाटील यांनी शिस्तबद्ध नियोजनातून परीक्षा यशस्वीपणे पार पाडली.
या सराव परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिवर्धा, कलमाडी, तऱ्हाडी (ता. बो.), काथर्दे दिगर, काथर्दे खुर्द, काथर्दे दिगर पुनर्वसन, कलसाडी, वाघोदा, सोनवल (ता. बो.), कोठली आणि ठेंगचे या ११ शाळांमधील एकूण ६० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परिवर्धा शाळेचा सर्वजित ठाकरे प्रथम, श्रद्धा ठाकरे द्वितीय, भाग्यश्री वडार (काथर्दे खु.) तृतीय, पल्लवी गिरासे (कलमाडी) चौथी आणि बादल हटेला (तऱ्हाडी ता. बो.) पाचवा क्रमांक पटकावून तालुका स्तरावरील शिष्यवृत्ती सराव परीक्षेसाठी निवड करण्यात आली.
या उपक्रमासाठी परिवर्धा केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच इयत्ता चौथीचे वर्गशिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शहादा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. डॉ. योगेश सावळे तसेच शिक्षण विस्तार अधिकारी डी. डी. राजपूत यांनी उपक्रमाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
माध्यमिक शाळेचे अर्पित चौधरी, गजानन मराठे, छोटू पाटील, नितीन पाटील आणि अनिता पाटील यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
केंद्र प्रमुख अशोक देवरे यांनी सांगितले की, ‘मिशन परिवर्धा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता व आत्मविश्वास वाढत आहे.’
एकूणच, ‘मिशन परिवर्धा’ उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देणारा ठरत असून भविष्यात अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
४ थी शिष्यवृत्ती सराव परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘मिशन गरुडझेप’ अंतर्गत ‘मिशन परिवर्धा’ उपक्रम यशस्वी

#missiongarudzep#scholarshipexam#education#zpschools#collectorofficenandurbar