Home नंदुरबार जिल्हा वन विभाग भरती : फॉरेस्ट गार्ड परिक्षा केंद्र बदलून द्या ! परीक्षार्थींची...

वन विभाग भरती : फॉरेस्ट गार्ड परिक्षा केंद्र बदलून द्या ! परीक्षार्थींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Forest Guard Exam Center
Forest Guard Exam Center

(अक्कलकुवा) वन विभागाच्या फॉरेस्ट गार्ड भरतीसाठी लाखो तरुणांनी अर्ज केलेले आहेत.९००/१००० रुपये शुल्क आकारण्यात आले असुन परीक्षार्थीना आता परिक्षा केंद्र देण्यात आले आहेत. परंतु परीक्षेचे ठिकाण सुमारे दोनशे ते चारशे किलोमीटर अंतरावर असल्याने चांगलीच दमछाक होणार आहे. याबाबत अक्कलकुवा येथील तरुणांनी तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांकडे परिक्षा केंद्र बदलून मिळण्यासाठी अर्जाद्वारे मागणी केलेली आहे. Forest Guard Exam Center

आमचे परीक्षा केंद्र बदलून मिळावे (Forest Guard Exam Center)
अर्जात म्हटले आहे की, त्यातल्या त्यात पैशांचा चुराडा देखील होणार आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्यांनी परिक्षा केंद्र गाठायचे कसे? या विचाराने बरेच सुशक्षित तरुण चिंतीत आहेत. आम्ही सर्व विद्यार्थी वन विभाग भरती करिता ऑनलाईन अर्ज केले होते. अर्ज भरण्यासाठी ९००/१००० रुपये फी जमा केलेली आहे. आम्ही अर्ज करीत असताना अर्ज स्वीकारणाऱ्या संस्थेने (टीसीएस) दिलेल्या परिक्षा केंद्र पर्याय म्हणुन निवडून आम्हाला सोय होईल असे ठिकाण आम्ही निवडले होते. मात्र त्यातून आम्हा सर्व विद्यार्थ्यांना एकही परिक्षा केंद्र मिळाले नाही. तर आम्हाला आलेले परिक्षा केंद्र आमच्या गावापासून ४००/४५० किलोमीटर अंतरावर आहे. सर/मॅडम मी नंदुरबार जिल्ह्यातील आहे आणि मला परिक्षा केंद्र अकोला देण्यात आले आहे. एवढे लांब परिक्षा केंद्र असेल तर मी तिथं जाऊ कसा? राहु कसा? खाऊ कसा? सर मी अती दुर्गम भागातील विद्यार्थी आहे.आदिवासी विद्यार्थी आहे. आणि असे हजारो विद्यार्थी आहेत. आमच्याकडे एवढे पैसे नाहीत की आम्ही सर्व ॲडजस्टमेंट करू शकणार. सर, मॅडम मग यास जिम्मेदार कोण? आम्ही सर्व बेरोजगार आहोत आणि एवढा पैसा आम्हाला कुठून मिळेल?
सर/मॅडम माझी व आमच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे आपणास नम्र विनंतीआहे की, आमचे परीक्षा केंद्र बदलून मिळावे. याच्यात जर बदल झाला नाही तर तलाठी भरती सुद्धा हीच संस्था घेणार आहे. मग तेव्हा पण आम्ही असंच समजायचं का की, संस्था मुख्यमंत्री आणि शासनाच्या सुद्धा ऐकत नाही. तरी आपणास विनंती आहे की यावर आपण तात्काळ कारवाई करावी.
असे आशयाचे विनंती पत्र अक्कलकुवा येथील परीक्षार्थींनी तहसिलदार यांचेकडे दिले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version