Home महाराष्ट्र नंदुरबार जिल्ह्यात RBSK-2.0 ची यशस्वी अंमलबजावणी: जिल्ह्यातील २५ बालके डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी नाशिकला...

नंदुरबार जिल्ह्यात RBSK-2.0 ची यशस्वी अंमलबजावणी: जिल्ह्यातील २५ बालके डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी नाशिकला रवाना

Successful implementation of RBSK-2.0 in Nandurbar district: 25 children from the district left for Nashik for eye surgery

नंदुरबार जिल्ह्यात राज्य शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK-2.0) अंतर्गत बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी प्रभावी काम सुरू असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची यशस्वी अंमलबजावणी होत आहे.

० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शासकीय व निमशासकीय शाळा, आश्रमशाळा आणि अंगणवाडी स्तरावर करण्यात येत आहे. या तपासणी मोहिमेमध्ये बालकांचे आजार ओळखणे, तात्काळ उपचार देणे, गरजू बालकांना संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा व समुपदेशन अशा विविध बाबींचा समावेश आहे.

या तपासणी दरम्यान जिल्ह्यातील २५ बालकांमध्ये डोळ्यात किरडेपणा/मोतीबिंदू आढळून आला. त्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत RBSK-2.0 माध्यमातून या सर्व बालकांची नाशिक येथील रेडियंट प्लस हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना आणि RBSK-2.0 अंतर्गत या शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य होणार असून पालकांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.

दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी ही बालके जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथून MSRTC बसने नाशिककडे रवाना करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. रोहन थोरात यांनी हिरवा झेंडा दाखवून बालकांना शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक श्री. मनोहर ढीवरे यांनी सविस्तर नियोजन केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली NHM फायनान्स मॅनेजर श्री. धीरज गावित, FLC श्री. मनोज चौधरी यांच्या समन्वयामुळे बालकांची वेळेत रवानगी शक्य झाली. तसेच बालकांसोबत नाशिक येथे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक श्री. मनोहर ढीवरे, सहाय्यक श्री. करण वसावे, फार्मासिस्ट श्री. सुरेश पाडवी उपस्थित राहणार आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी प्रशासनाचे हे पाऊल आशादायी ठरत असून RBSK-2.0 च्या माध्यमातून आरोग्यसेवा थेट गरजूंपर्यंत पोहोचत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

#RBSK#NHM#FreeSurgery#collectorofficenandurbar

error: Content is protected !!
Exit mobile version