नंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम नर्मदा काठावरील गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अंतर्गत नियमित आणि वेळेवर धान्य पुरवठा करण्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाने विशेष उपाययोजना केल्या आहेत.
महाराष्ट्रातील अक्कलकुवा गोदामातून, गुजरातमधील सागबारा-डेडियापाडा-राजपिपला-केवडिया कॉलनी (सरदार सरोवर धरण) मार्गे धान्य पाठवले जाते.
अक्राणी गोदामातून भूषा मार्गे बार्जद्वारे धान्य वाहतूक केली जाते.
जिल्हा पुरवठा कार्यालय आणि तालुका पुरवठा कार्यालयांच्या नियोजनामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवला जात आहे. धान्य वेळेवर पोहोचल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले असून, प्रशासनाच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्रोत: जिल्हा पुरवठा कार्यालय, नंदुरबार – District Supply Office Nandurbar
