Home नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात वृक्षारोपण मोहिमेचा यशस्वी शुभारंभ!

नंदुरबार जिल्ह्यात वृक्षारोपण मोहिमेचा यशस्वी शुभारंभ!

Successful launch of tree plantation campaign in Nandurbar district!

नंदुरबार वन विभाग व नंदुरबार रोहयो वनक्षेत्र अंतर्गत मौजे भांगडा (कक्ष क्र. ३०) येथे वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम वन विभाग नंदुरबार आणि इको बटालियन यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरित्या संपन्न झाला.

प्रमुख उपस्थित मान्यवर:

मा. श्रीमती अंजली शर्मा (प्रांत अधिकारी, नंदुरबार),मा. श्री श्रावण दत्त (पोलीस अधीक्षक, नंदुरबार), मा. श्रीमती निनू सोमराज (वनसंरक्षक, धुळे प्रादेशिक),मा. श्री संतोष सस्ते (उपवनसंरक्षक, नंदुरबार), मा. श्री कांबळे साहेब (अतिरिक्त पोलीस अधीक्षक, नंदुरबार), मा. कर्नल निर्देश शाह (कमांडिंग ऑफिसर, इको टास्क फोर्स), मा. मेजर प्रमोद बहिरट, डॉ. शरद कासार, मा. श्री धनंजय पवार (सहायक वनसंरक्षक, नंदुरबार), मेजर अनिरुद्ध काळे, सुभेदार सुभाष गव्हाणे, श्री. नितीन वाघ (वनक्षेत्रपाल, रोहयो नंदुरबार), श्री. मंगेश चौधरी (वनक्षेत्रपाल, चिंचपाडा),श्री. संदीप रणदिवे (वनक्षेत्रपाल, नवापूर), श्री. किरण खेडकर (पोलीस निरीक्षक, उपनगर नंदुरबार), श्री. जगन वळवी (पोलीस निरीक्षक, नंदुरबार)

यावेळी वनक्षेत्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी, पोलीस विभाग, इको बटालियनचे जवान, गस्ती पथक शहादा, तसेच नवापूर, चिंचपाडा व नंदुरबार येथील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सन 2025 च्या पावसाळ्यात इको बटालियनतर्फे 200 हेक्टर क्षेत्रावर 2 लाख विविध प्रजातींची वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. ही मोहीम जैवविविधता संवर्धन, पर्यावरण संतुलन व हरित क्षेत्र वाढविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

ही मोहीम पर्यावरण रक्षणासाठी जिल्ह्यातील एक आदर्श उपक्रम ठरणार असून, जनतेनेही या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

#वृक्षारोपण2025#हरितनंदुरबार#EcoBattalion#वनविभाग#SustainableEnvironment#GreenMission#PlantATree

error: Content is protected !!
Exit mobile version