Home नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे Lap TL शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन

ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे Lap TL शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन

Successful organization of Lap TL surgery camp at Rural Hospital Dhanora

नंदुरबार जिल्ह्यातील कुटुंब नियोजन सेवांना बळकटी देण्याच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे Lap TL (Laparoscopic Tubal Ligation) शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण ३४ लाभार्थ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

हे शिबिर मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे व मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालय धानोरा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रीती पटले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिबिराचे नियोजन व अंमलबजावणी प्रभावीपणे पार पडली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रज्ञा वळवी, एम.एस. नटावद, डॉ. जाफर तडवी (तालुका आरोग्य अधिकारी), डॉ. योगेश वळवी (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र नटावद) तसेच डॉ. किर्ती वसावे (एम.एस., उपजिल्हा रुग्णालय नवापूर) यांनी मोलाचे सहकार्य केले.

याशिवाय सर्व सीएचओ, परिचारिका कर्मचारी, सहाय्यक कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्या अथक परिश्रमांमुळे हे शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. रुग्णसेवा, समुपदेशन, शस्त्रक्रियापूर्व तयारी व शस्त्रक्रियेनंतरची काळजी या सर्व टप्प्यांवर आरोग्य यंत्रणेने समन्वयाने काम केल्यामुळे लाभार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार सेवा मिळू शकली.

नंदुरबार जिल्हा आरोग्य विभाग कुटुंब नियोजन, मातृ व बाल आरोग्य तसेच दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा प्रभावीपणे पोहोचत आहे.

(RuralHospitalDhanora)

#districthealthdepartment#laptl#familyplanning#PublicHealth

#HealthcareForAll

error: Content is protected !!
Exit mobile version