“Teacher of the Week” हा तळोदा तालुक्यात राबवण्यात येणारा एक अभिनव उपक्रम असून, प्रत्येक आठवड्याला विशेष उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या एका शिक्षकाचा सन्मान करण्यात येतो. हा उपक्रम मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सावनकुमार साहेब व मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री. भानुदास रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जात असून, यामधून शिक्षकांना कार्याची दखल घेतल्याचे समाधान मिळते आणि इतर शिक्षकांसाठीही एक प्रेरणा ठरते.
प्रत्येक आठवड्याला तालुक्यातील एका शिक्षकाची निवड “Teacher of the Week” म्हणून केली जाते. निवड प्रक्रियेत विद्यार्थी गुणवत्ता वाढ, नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती, उपस्थितीसाठी विशेष प्रयत्न, शाळेप्रती समर्पण, समाज व पालकांशी सहकार्य अशा विविध निकषांचा समावेश असतो.
गटशिक्षणाधिकारी श्री. शेखर धनगर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. वसंत जाधव व श्री. ज्ञानदेव केदार हे प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन निरीक्षण करतात आणि संबंधित शिक्षकाची निवड करत असतात.
पुरस्काराचे महत्त्व:
या पुरस्कारामुळे निवड झालेल्या शिक्षकांना त्यांच्या कार्याची प्रामाणिक दखल घेतली गेल्याचे समाधान मिळते आणि कार्यात सातत्यता व आत्मविश्वास वाढतो. इतर शिक्षकांसाठी हे एक प्रेरणास्थान ठरते, तसेच शिक्षकांमध्ये सकारात्मक स्पर्धा, समर्पणाची भावना आणि कल्पकता वाढीस लागते. परिणामी शालेय वातावरण अधिक सकारात्मक व आनंददायी बनते.
प्रेरणादायी उदाहरणे:

उपक्रमाचे परिणाम:
या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि उपस्थिती वाढली, शाळांमध्ये स्वच्छ, सुंदर व सुरक्षित वातावरण निर्माण झाले. शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने सकारात्मक बदल घडवत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
#teacheroftheweek#ZP_Taloda#InspiredByTeachers#positiveeducation#talodamodel#ZPTalodaInitiative