(नंदुरबार) महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (ATMA) आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘तेजस्विनी कृषी संस्कृती २०२६’ या भव्य प्रदर्शनीचा समारोप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या प्रदर्शनीत एकूण 72 महिला बचत गटांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपली उत्पादने, कौशल्य आणि उद्यमशीलता प्रभावीपणे सादर केली. दीपप्रज्वलन व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
समारोप कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, प्रकल्प संचालक दीपक पटेल (ATMA), कांतागौरी बनकर (माविम), विजय पाटील (कृषी विभाग) तसेच जयश्री सपकाळ (CYDA) उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात मागील तीन दिवसांचा आढावा सादर करण्यात आला. यानंतर मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी यांनी महिला बचत गटांच्या उद्यमशीलतेचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली.
#Tejaswini2026#WomenEmpowerment#SHG#Agriculture#ATMA#MAVIM#Nandurbar#RuralEntrepreneurship#SelfHelpGroups#VocalForLocal
