Home नंदुरबार जिल्हा ‘तेजस्विनी आठवडे बाजार’चे उद्घाटन संपन्न — ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनासाठी प्रेरणादायी पाऊल!

‘तेजस्विनी आठवडे बाजार’चे उद्घाटन संपन्न — ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनासाठी प्रेरणादायी पाऊल!

'Tejaswini Weekly Bazaar' inaugurated — an inspiring step for the self-reliance of rural women!

(नंदुरबार) महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत ज्ञानदीप गाव विकास समिती, पिंपळोद यांच्या वतीने आयोजित ‘तेजस्विनी आठवडे बाजार’ या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या शुभहस्ते झाले.

हा बाजार महिलांनी महिलांसाठी भरविण्यात आलेला नंदुरबार जिल्ह्यातील पहिला उपक्रम असून, ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग दाखविणारा आहे. या बाजारात निमगाव, कोकणीपाडा, लोय, पिंपळोद, जांभीपाडा, धुळवद आणि खांडबारा या गावांतील ४१ महिलांनी आपले स्टॉल लावले. सोमवारपासून हा बाजार नियमित भरविण्यात येणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश — ग्रामीण भागातील महिलांना उद्यमशीलतेकडे प्रेरणा देणे, त्यांच्या हातच्या वस्तूंना थेट ग्राहकांपर्यंत बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हा आहे.

कार्यक्रमादरम्यान डॉ. मित्ताली सेठी यांनी महिलांच्या पुढाकाराचे कौतुक करत त्यांना अधिकाधिक आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याचे प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानदीप गाव विकास समिती (महिला आर्थिक विकास महामंडळ), प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्र, आणि ग्रुप ग्रामपंचायत पिंपळोद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

कार्यक्रमास कांतागौरी बनकर (वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी, माविम नंदुरबार), आरती देशमुख (कृषी विज्ञान केंद्र), बी. एन. पाटील (ग्रामपंचायत अधिकारी, पिंपळोद), दीपक वळवी (पोलीस पाटील), भावना वळवी (महसूल अधिकारी), प्रकाश पाटील (मंडळ अधिकारी, धानोरा), श्यामकांत पाटील (DSC), तेजल चौधरी (स्मित हॉस्पिटल, नंदुरबार), शेख सर (मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, पिंपळोद) आणि शिवाजी परमार (युथ एड फाउंडेशन) मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पिंपळोद ग्रुप ग्रामपंचायत टीम, माविम टीम, प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्र टीम, DSC टीम आणि स्मित हॉस्पिटल टीम यांचे विशेष योगदान लाभले.

‘तेजस्विनी आठवडे बाजार— महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि स्वावलंबनाचा तेजस्वी दीप!

Mavim Nandurbar

#तेजस्विनीआठवडेबाजार#WomenEmpowerment#MAVIM#Nandurbar#DrMitaliSethi#SelfReliance#RuralWomen#Tejaswini#Pimpalod#MahilaSwayamsahayyaGat

error: Content is protected !!
Exit mobile version