Home टेक न्युज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते काळा घोडा आर्ट एवेन्यू सौंदर्यीकरण कामांचे लोकार्पण...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते काळा घोडा आर्ट एवेन्यू सौंदर्यीकरण कामांचे लोकार्पण काळा घोडा प्लाझा, बी. भरूचा मार्ग येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले

1
The beautification works of the Kala Ghoda Art Avenue were inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis at a ceremony held at Kala Ghoda Plaza, B. Bharucha Marg.

मुंबईचे वैभव असलेल्या काळाघोडा परिसरातील रस्त्यांचे अत्यंत उत्तमरित्या सुशोभीकरण करण्यात आले आहे. सुशोभीकरण कामातून कलात्मक व तत्कालीन वास्तुकलेशी समरसता जपण्यात आली आहे. कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा झालेल्या संगमातून या परिसराचे नवे रूप नागरिकांना अनुभवता येणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागरिकांसाठी असलेली ही व्यवस्था ‘हेरिटेज वॉक’ आहे. येथील पाथ वे आणि प्रत्येक जागेला कलात्मक स्पर्श करण्यात आला आहे. अत्यंत सुंदर व्यवस्था आहे त्याच शिस्तीमध्ये सुरू राहावी, यासाठी येथे येणारे नागरिक, येथील व्यावसायिक यांनी दक्षता घ्यावी, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार, महापौर रितू तावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, मनपा विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर, सभागृह नेते गणेश खणकर, नगरसेवक हर्षिता नार्वेकर, बृन्हमुंबई महानगर पालिका आयुक्त अश्विनी भिडे, बृन्हमुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे आदी उपस्थित होते.