Home महाराष्ट्र असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्यावतीने आयोजित ‘खासदार औद्योगिक महोत्सव- ॲडव्हान्टेज विदर्भ-२०२६’ च्या तिसऱ्या...

असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्यावतीने आयोजित ‘खासदार औद्योगिक महोत्सव- ॲडव्हान्टेज विदर्भ-२०२६’ च्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

The Central Government's ambitious 'Compliance Burden Reduction and Deregulation'

नागपूर विद्यापीठ परिसरात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

गडचिरोली येथे जगातील सर्वात मोठे ग्रीन स्टिल हब, नागपुरात सोलर मॉड्यूल आणि अमरावतीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाची पाऊले पडली आहेत. निर्मिती आणि सेवा क्षेत्रात विदर्भाची घोडदौड सुरु आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत झालेल्या १५ हजार कोटी गुंतवणुकीच्या सामंजस्य करारातून नागपूरमध्ये ऑटोमोबाईल उद्योगाचे पदार्पण झाले आहे, या सर्व प्रयत्नांतून येत्या ५ वर्षांत विदर्भाचा सर्वांगीण विकास साधण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटनप्रसंगी केले. त्यांच्या उपस्थितीत विदर्भासाठी विविध चार गुंतवणूक करारही यावेळी करण्यात आले.

गडचिरोली ते वाशिम अशा विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधील गरिबी, बेरोजगारी दूर करून या भागाला समृद्ध व संपन्न करण्याचे स्वप्न असून ते पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या ५ वर्षात विदर्भात ५ लाख रोजगार निर्मिती करण्यात येईल असे प्रतिपादन केले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर ,आमदार सर्वश्री डॉ.परिणय फुके, चरणसिंह ठाकूर, सुमित वानखेडे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन, उद्योजक पद्मश्री सत्यनारायण नुवाल आणि देश-विदेशातील उद्योजक यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version