
जिल्ह्यातील समाधानकारक पावसामुळे सर्व धरणे १०० टक्के भरली असून जानाई-शिरसाई योजनेतून तालुक्यातील सर्व जलसाठे-तलाव तातडीने भरण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून बारामती विधानसभा मतदारसंघ अंतर्गत श्री शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेकनॉलॉजी सोमेश्वर येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरुपात लाभ प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच महसूल व कृषी विभागाच्या महत्त्वपूर्ण सुधारणा व कार्यालयीन सेवांची माहिती पुस्तिकाचे अनावरणही करण्यात आले.