
नव्या काळांच्या आव्हानांना सामोरे जाऊन ग्लोबल ब्रँड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूनी दाखविला आहे. ग्लोबल ब्रँड झालेल्या ‘चितळे बंधू’ आणि राज्यातील खाद्य उद्योगाला प्रगत ब्रँडच्या रुपात जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
‘व्हिजन पार्क’च्या माध्यमातून खाद्य उद्योगातील आधुनिक सुविधा उभ्या रहात आहेत. या सुविधेतून चितळे बंधूंची दूरदृष्टी पहायला मिळते. स्वच्छता आणि शुद्धतेच्या बाबतीत कुठेही मानवी हस्तक्षेप नसलेली उत्तम दर्जाची यंत्रणा परदेशी यंत्रांमध्ये अनुभवाच्या आधारे आवश्यक बदल करून उभारण्यात आली आहे. इथे नूतनीकरणीय ऊर्जेचा उपयोग करण्यात आला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
परदेशी नागरिक भारतीय पदार्थांकडे आकर्षित होऊ लागले आहेत. अशावेळी चितळे यांचे महाराष्ट्रीयन पदार्थदेखील अशाचप्रकारे जगात पोहोचतील आणि लोकप्रिय होतील, असा विश्वास व्यक्त करून शासन म्हणून ‘एक्सपोर्ट ओरिएंटेड फूड इंडस्ट्री’ला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे,शंकर मांडेकर, इंद्रनील चितळे, गोविंद चितळे, श्रीकृष्ण चितळे, केदार चितळे आदी उपस्थित होते.