Home महाराष्ट्र चिंचभुवन येथील पर्यायाची गावठाणातील सेक्टर क्रमांक ३४, ३५ व ३६ मध्ये तयार...

चिंचभुवन येथील पर्यायाची गावठाणातील सेक्टर क्रमांक ३४, ३५ व ३६ मध्ये तयार करण्यात आलेल्या नागरी सुविधा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्यात आल्या.

The civic amenities constructed in Sectors 34, 35 and 36 of Paryanchachi Gavthana in Chinchbhuvan were handed over to the Nagpur Municipal Corporation today by Chief Minister Devendra Fadnavis.

तसेच मिहान इंडिया लिमिटेडकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५० लाखांचा धनादेश नागपूर येथील रामगिरी शासकीय निवासस्थानी सुपूर्द करण्यात आला.

मिहान इंडिया लिमिटेडच्या सामाजिक उत्तरदायीत्व निधी (सीएसआर) अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयाला ४५ लाख ४३ हजार ९३६ रूपयांचा धनादेश, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयाला ३० लाखांचा, महानगरपालिकेला २५ लाखांचा तर वुमेन एज्युकेशन सोसायटीला (एलएडी महाविद्यालय) २४ लाख ९३ हजारांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

error: Content is protected !!
Exit mobile version