
निर्देश देत या प्रकरणासंदर्भात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकींचे इतिवृत्त मागवून चौकशी करण्याचे आदेश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एचडीएफसी इरगो इन्श्युरन्स कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणेबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत प्रशासनाला दिले.
अकोला जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगाम २०२३ आणि खरीप हंगाम २०२४ मधील पीक विमा भरपाई प्रक्रियेतील त्रुटी, शेतकऱ्यांचे आक्षेप आणि विमा कंपनीच्या कार्यपद्धती तपासा. या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कोणत्याही परिस्थितीत विमा कंपन्यांच्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत. याबाबत आतापर्यंत विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या बैठकांचे व इतिवृत्ताचे अहवाल राज्य शासनाकडे सादर करावेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येऊन आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेण्याबाबतचे निर्देश कृषिमंत्री भरणे यांनी दिले.
एचडीएफसी इरगो इन्श्युरन्स कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणेबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीस कामगार मंत्री आकाश फुंडकर, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार हरीष पिंपळे, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, (दूरदृश्य प्रणालीद्वारे) कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी संचालक विनयकुमार आवटे, अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी बाळासाहेब गोपाळ, भारतीय किसान संघाचे प्रांत उपाध्यक्ष राहुल राठी आदी उपस्थित होते.