Home देश-विदेश ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी...

‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला

0
The 'Drug-Free Youth for Developed India' campaign was launched today by Prime Minister Narendra Modi.

याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रामगिरी निवासस्थान, नागपूर येथून ऑनलाइन उपस्थित होते.

विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करताना व्यसनमुक्त, निरोगी आणि सक्षम युवा शक्ती घडविण्याचा संकल्प या अभियानाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. युवकांनी अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहून शिक्षण, कौशल्य, क्रीडा आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारून समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यसनमुक्तभारत आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी शासन, शैक्षणिक संस्था, पालक, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील सर्व घटकांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि विविध राज्यांतील मान्यवरही उपस्थित होते.

#नशामुक्तयुवा

#नशामुक्तभारत

#AddictionFreeIndia

#NashaMuktBharat